नमस्कार मी विजय रा गिरी (स शि) जि प प्राथमिक शाळा कन्हेरी ता रिसोड जि वाशिम. मोबा नंबर 8805577729 SMART LEARNING या माझ्या ब्लॉग वर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत !!!

cross column 3

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक १७/१०/२०२४ रोजीपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 🙏🙏🙏 i

Tuesday, December 6, 2022

❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 6/12/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 15 〇 

════════════════

 मृदा हा अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. आरोग्यदायक मृदा हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या ९० टक्के गरजा मातीद्वारे पूर्ण होतात. जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मुलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही.

शेत मशागतीच्या चुकीच्या पद्धती, बेसुमार जंगलतोड, अनिर्बंध चराई, वारा, जोराचा पाऊस, इ. कारणांमुळे जमिनीची धूप होते. हजारो वर्षांनी बनलेला हा मातीचा थर नष्ट व्हायला अत्यल्प कालावधीही पुरेसा ठरतो. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अन्नाची गरज भागविण्यासाठी अन्नधान्य उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे.

रासायनिक खतांचा वारेमाप वापर व सेंद्रिय खतांचा अभाव, एकापाठोपाठ एकच पीक घेण्याची पद्धती, दिवसेंदिवस वाढणारी अन्नधान्याची गरज व त्यामुळे शेतीवर पडणारा अतिभार इत्यादी घटकांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर, उत्पादकतेवर आणि गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या साधनांचा योग्य वापर करून उत्पादन वाढविणे आणि जमिनीची सुपीकता टिकविण्याकडे भर देणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या माऊलीसाठी हीच खरी कृतज्ञता ठरेल!


1】अन्नधान्याच्या 90 % गरजा पूर्ण होतात ....

A ) कारखान्यातुन      B)  दुकानातून     C) विदेशातुन      D) शेतीतून

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2】पृथ्वीचा किती भाग विविध जीवानी व्यापला आहे ?

  A )  2/4     B)1/2 

   C) 1/4   D)3/4

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3】 मृदे मध्ये कोणती क्षमता नाही ?

 A )पाणी साठवण्याची      

B) पाणी अड़वण्याची 

C)पाणी वाचवण्याची 

D)पाणी शुद्ध करण्याची 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

4】मृदा म्हणजे ....

 A ) शेती      B)  मती    C)  माती    D) नरम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

5】माती पाया आहे ?

  A )  पीके      B) शेती     C) पीके व शेती  D) पाणी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

6】माती शिवाय शेती संकल्पना यशस्वी होऊ शकली नाही कारण 

  A ) पृथ्वीवर माति कमी आहे       B)   पृथ्वीवर पाणी कमी आहे     C)  पृथ्वीवरील जनतेचे  पोट भरण्याची कूवत त्यात नाही 

D)मातीशिवाय शेती होऊ शकत नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

7】जमिनिची धूप  पुढीलपैकी कशाने होत नाही ..

  A ) जंगलतोड      B)ज़ोराचा पाऊस   C) गारा      D) अनियंत्रित चराई

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

8】उताऱ्यात कष्टकऱ्यांची माउली कुणाला उद्देशीलेले आहे ? 

  A ) शेतकरी      B) माति    C) खते      D) अन्न

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

9】कमतरता असणे या शब्दासाठी उताऱ्यात आलेला शब्द कोणता ? 

  A ) अभाव      B )मृदा       C) जैविक     D) वारेमाप

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

10】रासायनिक खतांचा वारेमाप वापर येथे वारेमाप म्हणजे ...

  A ) कमी प्रमाणात

  B)   मोठ्या प्रमाणात   

  C)योग्य प्रमाणात

 D) वाऱ्या सारखा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

11】 पिकांची वाढ व गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होत आहे..

A) जमिनिच्या सुपिकतेमुळे

B) जमिनिची धूप होत आहे त्यामुळे

C) शेतकऱ्यांच्या आळशी वृत्तिमुळे

D) साधनाचा अभाव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

12】सुपिक च्या विपरीत अर्थाचा शब्द

A)अपिक B) चांगल पिक

C) नापिक D) अतिपिक

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Saturday, December 3, 2022

 मनात आणलं तर अशक्य काही नसतं हे आपल्याला थोर तत्वज्ञानी शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचं जीवन बघून म्हणता येईल. जगभर 10 टक्के म्हणजे 65 कोटी लोक या ना त्या कारणांनी अपंग आहेत. अपंगांना सहानुभूतीची नव्हे विश्वास देण्याची गरज आहे

-आज जागतिक अपंग दिन

सर्व अपंग बंधू - भगिनींना सलाम

Friday, November 25, 2022

 ❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 25/11/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

💐  उतारा 14   💐

════════════════

सील हा जलचर सस्तन प्राणी आहेत. सस्तन पृष्ठवंशीयांपैकी पण सारे आयुष्य पाण्यात काढणारी समुद्रसिंहाची ही जमात अतिथंड प्रदेशात समुद्रात आढळते. .सील या नावाने हे समुद्रसिंह जगभर ओळखले जातात. थंड समुद्री प्रदेशात खरे म्हणजे यांचा मोठा वावर आढळतो. अवाढव्य देह, प्रचंड वजन; पण अत्यंत चपळ हालचाल करत असल्याने त्यांना फारसे शत्रू नाहीत; पण काही वेळा शार्क माशांचा त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. माणूस मात्र त्यांचा कायमचाच शत्रू बनलेला आहे.  सीलच्या कातड्याला जगभर असलेली मागणी हेच त्याचे एकमेव कारण.

 सीलचे वैशिष्ट्य म्हणजे नर व मादीमधील आकारमानातला प्रचंड फरक. सील मादी आकाराने नराच्या जेमतेम दोन तृतियांशसुद्धा असते. सस्तन प्राण्यांत आकारमानात एवढा मोठा फरक क्वचितच सीलच्या दुधामध्ये चरबीचे प्रमाण चक्क पन्नास टक्के असते. त्यामुळे बाळांची वाढ अक्षरश: दिवसागणिक झालेली आढळते. बाळांची वाढ जशी झपाट्याने होते. सीलला सहसा एका वेळी एकच पिल्लू होते.

सील मासे खाऊन जगतो; पण तेही कोणते? तर माणूस खात नाही असे. ज्या माशांची चव माणसाला आवडत नाही, असे सर्व मासे सील अगदी आवडीने खातो.  पाण्यातील प्रवाहांची दिशा त्यांच्या भल्यामोठ्या लांबलचक मिशारुपी केसांमुळे त्यांना समजते. प्रवाहाविरुद्ध सतत पोहत राहणारे हे मासे मटकावणे या सीलला मग सहज जमते.

सीलच्या सध्या ज्ञात तेहतीस जाती आहेत. प्राण्यांच्या दृष्टीने तसे त्यांना दीर्घायुष्य लाभले आहे. सील सर्वसाधारण पस्तीस ते चाळीस वर्षे जगतो.

════════════════

1】 सील हा प्राणी साधारणपणे प्रदेशात आढळतो ?

 A )  समुद्री      B) पठारी       C)  दलदलीचा    D) शुष्क

➖➖➖➖➖➖➖➖➖

2】सील ला जास्त शत्रु नाहीत कारण - 

  A ) अवास्तव शरीर    B)  भरपूर वजन    C) चपळता     D) सर्व पर्याय बरोबर.

➖➖➖➖➖➖➖➖➖

3】सील ला जास्त शत्रु नाहीत परंतु पासून त्याला धोका आहे ? 

 A ) शार्क     B) माणूस      

C)  शार्क व माणूस    D) मासे


➖➖➖➖➖➖➖➖➖

4] मानव सील ची शिकार करतो कारण .....

  A ) तो सस्तन  प्राणी आहे.   

B) तो पृष्ठवंशिय  प्राणी आहे.     

C) तो समुद्रप्राणी आहे. 

 D) त्याच्या कातडिला जगभर मागणी आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖

5】सिलच्या सध्या तेहतीस जाती ज्ञात येथे ज्ञात म्हणजे ??

  A ) जीवंत      B) मृत       C)  माहित    D) सस्तन


➖➖➖➖➖➖➖➖➖

6】सीलच्या बाळाची वाढ प्रत्येक दिवशी होते ?

A ) त्यांचा आकार अवाढव्य असतो.

  B) त्यांना दीर्घायुष्य लाभले आहे.

  C) त्यांचे दूधात चरबीचे प्रमाण अधिक असते.

  D) ते शीत प्रदेशात राहतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖

7】सिलचे सरासरी आयुर्मान किती आहे ? 

  A ) 30 ते 30 वर्ष      B)  35 ते 40 वर्ष    C) 35 ते 45 वर्ष      D) 40 वर्ष

➖➖➖➖➖➖➖➖➖

8】सील मासे खातों ? 

A ) जे त्याला आवडतात ते       B) जे माणसाला आवडतात ते     C)  जे माणसाला आवडत नाहीत ते  

D) सर्व प्रकारचे मासे

➖➖➖➖➖➖➖➖➖

9】खाऊन टाकणे" यासाठी उताऱ्यात आलेला  पर्यायी शब्द कोणता ?

 A ) चपळ      B) फस्त      

C) मटकावणे     D) प्रवाह

➖➖➖➖➖➖➖➖➖

10】दीर्घायुष्य म्हणजे ... 

A )  कमी काळ जगणे 

B) सुखी आयुष्य

C)   खड़तर आयुष्य

 D) जास्त काळ जगणे

➖➖➖➖➖➖➖➖➖

11】सील नर आकाराने मादीच्या आकाराच्या .......... असते.

A) जेमतेम दोन तृतीयांश

B)जेमतेम एक तृतीयांश

C)जेमतेम सारखी

D) एकदम भिन्न

➖➖➖➖➖➖➖➖➖

12】खालीलपैकी काय सील च्या बाबतीत खरे नाही ? 

A) तो सस्तन प्राणी आहे.

B) तो दूधात चरबीचे प्रमाण 50% असते.

C) त्याला समुद्रसिंह म्हणतात.

D) तो एकावेळी अनेक प्राण्याना जन्मास घालतो.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

📝 विजय रा गिरी सर 

*जि प व प्रा शाळा शेलू खडसे* 

*ता रिसोड जि वाशिम* 

*8805577729*

vijaygiri143.blogspot.com 

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

संविधान दिनानिमित्त संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा सोडवा

Thursday, November 24, 2022

❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 
   दिनांक - 24/11/2022
खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा
     〇 उतारा 13 〇 
════════════════
एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही. त्‍या हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्‍यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्‍याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्‍या बळी पडून फळे खाण्‍यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्‍याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्‍याचे म्‍हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही. ════════════════
1】जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर होता. या वाक्यात वावर या शब्दाचा अर्थ आहे?
  A ) शेत   B) शिवार     
  C) ये-जा असणे  D) जमीन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2】हरणाने आपल्या इतर सहकार्याना सावध केले ...
  A) जंगल कमी होत चालले   याविषयी    
B) आपल्या सहकार्याची संख्या कमी होत चालली याबद्दल
C) फ़ळे कसे मिळवावे याविषयी D)भूकंपाविषयी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3】शिकारीसाठी उंचावर बांधलेला माळा यासाठी उताऱ्यात आलेला शब्द आहे?
A )मचाण       B)देरेदार      
C)A व B बरोबर    D) फांदया
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4】आपल्या सहकार्याची संख्या कमी होत चालली या वाक्यावरुन समजते ?
 A ) सहकारी अनुपस्थित होते              B) सहकारी शिकारीला गेलेत    C) सहकाऱ्यांची शिकार होत आहे. 
D)सर्व बरोबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5】वरील उताऱ्यास शोभेल असे शीर्षक दया.
  A ) एकावे जनाचे करावे मनाचे
  B) हरिण व जंगल      
C)  प्रलोभनाचा बळी    
D) मूर्ख हरिण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6】 शिकारी हरणाची शिकार करतात ....
 A ) झाडावर बसून    B) दाट पानाचे आड़ लपून   C) फ़ळे फेकून मारून    D) गोड बोलून
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7】सहकार्यानी हरणाचे म्हणणे ऐकले असते तर ...
  A ) त्याला फ़ळे खायला मिळाली नसती B) त्याला जंगलात फिरायल मिळाले नसते     C) त्याचा जीव वाचला असता    D) जंगलातिल प्राणी वाढले असते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8】शिकाऱ्याने फ़ळे फेकली कारण ...
 A ) ती सड़की होती      
B) ती  पिकलेली नव्हती   
C)हरणाना आकर्षित करण्यासाठी    
D) यापैकी नाही
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📝 विजय रा गिरी सर
जि प व प्रा शाळा शेलू खडसे 
ता रिसोड जि वाशिम 
8805577729
vijaygiri143.blogspot.com 
🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Sunday, November 20, 2022

आमची शाळा आमचे उपक्रम
➖➖〰️▪️〰️➖➖
🧒   जि प व प्राथमिक शाळा शेलू खडसे येथे  बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा   🧒

दप्तरमुक्त शनिवार उपक्रमा अंतर्गत ,अभ्यासात रंजकता यावी,शालेय विद्यार्थ्यांना गणिती माहितीचा व्यवहारात वापर करता यावा तसेच नफा तोटा , शेकडेवारी या संकल्पना मूर्त रुपात समजाव्या या उद्देशाने
जि प व प्राथमिक शाळा शेलू खडसे येथे शनिवार दिनांक 19/11/22 रोजी बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी चिमुकल्यानी विविध खाद्य पदार्थाचे दुकाने लावली होती. सर्व मुलांनी व पालकांनी विविध खाद्य पदार्थाचा आस्वाद घेतला. मुलानी खरी कमाईचा आनंद घेतला त्याच बरोबर यातून गणित ही शिकले. यावेळी  सर्व शाळा व्यवस्थापन समिति सदस्य व गावकऱ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपक्रमाचे यशस्वितेसाठी  शालेतिल सर्व शिक्षकवृन्दानी मेहनत घेतली. 
उपक्रमाची काही क्षणचित्रे.......




Thursday, November 17, 2022

❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 17/11/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 12 〇 

════════════════

 दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेवू शकला नाही. त्याने एक पत्र देवून त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघाना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धीवानाने धनवानास म्हंटले,"तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू." धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकास पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धीवान म्हणाला,"आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल.

  त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा?" त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला.

════════════════

1) काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही गेले ...

A) राजाकडे   

B)सम्राटाकड़े     

C) ज्योतिष्याकड़े  

 D) गावाकडे

2) राजाने एक पत्र देवून त्या दोघांना ...........कड़े पाठविले.

A) रोमाच्या राजाकडे   

B) रोमच्या सम्राटाकड़े     

C) ज्योतिष्याकड़े  

 D) गावाकडे 

3) वरील गोष्टीचे तात्पर्य काय आहे?

A) बुद्धि व धन दोन्ही श्रेष्ठ आहेत.

B)बुद्धि व धन दोन्ही यापैकी कोणीही श्रेष्ठ नाहीत.

C)बुद्धी हि सर्वश्रेष्ठ आहे.

D) प्रश्न सोडविन्या साठी भांडण करावे.

4) दुष्काळ या शब्दाचा विपरीत अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता ?

 A) वाईट काळ   B)  सुकाळ    C)  सुवर्ण  काळ D) यापैकी नाही

5)अखेर फाशी वाचविन्यात कोण यशस्वी ठरले ?

A) सम्राट      C) बुद्धिवान

B) धनवान   D) जोतिष्य 

6) बुद्धिवानाचे सांगण्यानुसार जर त्याला फाशी दिली असती तर......

A) तो मरेन तेथे भयंकर महामारी पडेल आणि त्याचा मित्र जेथे मरेल तेथे भयंकर दुष्काळ पसरेल B)    तो मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि त्याचा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल. C)  देशावरील संकट नष्ट झाले असते.

D)लाखो लोक महामारीपासून वाचतील.

7) वरील उताऱ्यावरुन बुद्धि वानाचा कोणता गुण दिसून येतो ?

A) स्पष्टवक्तेपणा   C) प्रसंवधान

B) नम्रता   D) धाडशीपणा

8)त्याने हार पत्करत बुद्धीवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. येथे

*पत्करत* म्हणजे 

A) पाठवत

B)आदेशित करत

C) स्वीकारत

D) नाकारत

9) उताऱ्यात कामी येणे या वाक्यचाराचा अर्थ आहे?

A) उपयोगी पडणे

B) कमी होणे

C)नाहीसे होणे

D) अदृश्य होणे

10) साथीच्या रोगाने अनेक लोक मरणे यासाठी योग्य शब्द कोणता ?

A) आस्मानी संकट

B)दैवी संकट

C)महामारी

D) मानवनिर्मित संकट

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Wednesday, November 16, 2022

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) फेब्रूवारी - २०२३ 

शिष्यवृत्ती परीक्षा - १२ फेब्रुवारी २३ रोजी होणार 

नियमित शुल्कासहीत फॉर्म भरण्याची तारीख

16 नोव्है ते 15 डिसेम्बर

संपूर्ण माहितीपत्रक खालील लिंक वरुन डाऊनलोड करा

शिष्यवृत्ती परीक्षेफॉर्म भरण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा.  ➖


अत्यंत महत्त्वाचे ➖  

सदरील पत्र व लिंक हे केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी व माहितीसाठी इथे ठेवण्यात आलेले आहे. सर्व हक्क महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या स्वाधीन आहेत.

 ❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 16/11/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 11 〇 

═══════════════

             एक जंगल होते. त्या जंगलात एक विचित्र आकाराचे झाड होते. त्याचे खोड आणि फांद्या आडव्यातिडव्या पसरल्या होत्या. या झाडाच्या भोवतालची झाडे उंच व सरळसोट वाढलेली होती. या छान आकाराच्या उंच झाडांकडे पाहून वेड्यावाकड्या झाडाला वाटायचे,” ही झाडे किती छान आणि सरळसोट आहेत!” मग दुःखी स्वरात ते स्वतःशीच म्हणायचे,” मी किती दुर्दैवी आहे! मी एकटाच असा वेडावाकडा आणि कुरूप का?”

एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या जंगलात आला. वेड्यावाकड्या झाडाकडे पाहून तो म्हणाला,” हे वेडेवाकडे झाड माझ्या अजिबात उपयोगाचे नाही.” मग त्याने छानशी, सरळ वाढलेली काही झाडे निवडली. त्या झाडांवर कुऱ्हाडीचे सपासप घाव घातले आणि ती तोडली.

त्यानंतर मात्र त्या वेड्यावाकड्या झाडाला आपल्या कुरुपतेबद्दल कधीच दुःख झाले नाही. खरे तर कुरुपतेमुळेच ते झाड लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीपासून वाचले होते.

════════════════

*1) वरील गोष्टीचे तात्पर्य काय आहे?* 

A)आपल्याजवळ जे आहे त्यात समाधान माना.

B)माणसाने सुंदर असावे.

C)माणसाने सरळ असावे.

D) जंगलतोड़ करु नये.


*2) सूंदर या शब्दाचा विपरीत अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द कोणता ?*

 A) वेडावाकडा   B)  देखणा    C)  कुरूप   D) असुंदर


*3) जंगलातील झाड़ दुःखी का होते ?* 

 A) ते सरळ होते म्हणून

    B) त्याचे भोवती झाड़े नव्हती म्हणून  

C)ते कुरूप होते म्हणून

 D) ते वाळलेले होते म्हणून


*4)लाकुड़तोड्याने कोणती झाडे तोड़ली ?* 

A) हिरवी    B)  सरळ   C) रस्त्याच्या कडेची  D) सरळसोट


*5) शेवटी त्या झाडाला आपल्या कुरूपते बद्दल दुःख वाटले नाही कारण  .....*

A) त्यामुळे ते लाकुड़तोड्याला दिसले नाही   B) त्यामुळेच ते तोडन्यापासून बचावले    C)त्याची कीमत वाढली  D) त्याला अवतीभोवती मोकळी जागा तयार झाली.


*6) सुदैवी या शब्दाचा कोणता विरुधार्थी शव्द उताऱ्यात आलेला  आहे?* 

A) छान     B) सरळसोट    C) चांगलादैवी   D) दुर्दैवी

7) खालील पैकी कोणते विशेषण झाडासाठी वापरले नाही?

A) सरळसोट     B)कुरूप     C) वेडेवाकडे    D) हिरवेगार


vijaygiri143.blogspot.com 

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Sunday, November 13, 2022


 📗पंडित नेहरू(सामान्यज्ञान प्रश्नावली)

१) ' भारताचा शोध ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

२) पंचशील तत्त्वांचा पुरस्कार कोणी केला 

३) पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात ?

४) ' आराम हराम है ! ' हे घोष वाक्य कोणी दिले ?

५) पंडित नेहरूंच्या समाधी स्थळाचे नाव काय ?

६) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?

७) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

८) पंडित नेहरूंचे निधन (मृत्यू) कोणत्या वर्षी झाले ?

९) पंडित नेहरूंचा जन्म कोणत्या शहरात झाला ?

१०) पंडित नेहरूंच्या आईचे नाव काय होते ?

११) पंडित नेहरूंच्या वडिलांचे नाव काय होते ?

१२) पंडित नेहरूंच्या पत्नीचे नाव काय होते ?

१३) पंडित नेहरूंच्या मुलीचे नाव काय होते ?

१४) कोणाचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो ?

==========================   

उत्तरे-  १)पंडित जवाहरलाल नेहरु  २) पंडित जवाहरलाल नेहरू  ३)चाचा   ४)'पंडित जवाहरलाल नेहरू ५)शांतीवन  ६)१४ नोव्हेंबर १८८९  ७)पंडित नेहरू  ८) २७ मे १९६४   ९) अलाहाबाद (उत्तरप्रदेश)  १०) स्वरूपरानी        ११) मोतीलाल नेहरू  १२) कमला नेहरू  १३)इंदिरा गांधी १४)पंडित नेहरू


 ❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

  खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 10 〇 

════════════════

             दुर्गम भागात फिरताना तीन साधुना एक झोपडी दिसते, ते झोपडीचा दरवाजा वाजवतात. घरातील महिला त्यांच्याकडे विचारणा करते,"आपण कोण आहात? आणि आपल्याला काय हवे आहे?" ते म्हणतात,"आम्ही तिघे भुकेले आहोत, अन्नाची काही व्यवस्था करा." झोपडी बाहेरील झाडाखाली विश्रांती करण्याची विनंती करत महिला पुन्हा घरात गेली, काही काळानंतर बाहेर येत ती तिन्ही साधूना जेवणासाठी आमंत्रित करते. तेंव्हा साधू म्हणतात," आमच्यापैकी केवळ एकचजण फक्त तुझ्या घरात प्रवेश करू शकतो." महिला आश्चर्यचकित होते व विचारते," असे का? भूक तिघानाही लागली आहे. पण येणार मात्र एकचजण?" साधू म्हणतात," हा आमच्यातील करार आहे. आमच्यातील एक "वैभव" आहे. तर दुसरा "यश" आणि तिसरा "प्रेम". आता तू ठरव कि आमच्यातील कोणाला आत बोलवायचे?" महिला गोंधळून जाते.

     ती पुन्हा घरात जाते, नवऱ्याशी चर्चा करते आणि बाहेर येते व "प्रेम" नावाच्या साधूला जेवणासाठी निमंत्रण देते. प्रेम घरात येताच त्याच्या पाठोपाठ "वैभव" आणि "यश" साधू पण जेवणासाठी घरात येतात. महिला पुन्हा गोंधळून जाते, तेंव्हा साधू म्हणतात," मुली ! तू प्रेम मागितले, त्या पाठोपाठ यश आणि वैभव तुझ्या घरात प्रवेशकर्ते झाले, पण तू वैभव किंवा यश यांना जर पाचारण केले असते तर आमच्यातील दोघे उपाशी राहिले असते." महिलेने तिघांचे यथायोग्य स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले.

1) वरील उताऱ्यात किती व्यक्तिचा उल्लेख आलेला आहे ? 

A) 2  B)   3   C)  4   D) 5

2) दुर्गम म्हणजे ....

A) दुर्मिळ B)  जाण्यास कठिण   C)  दुरवरचे  D) सहज जाता येणारे

3)तिघा साधूनी महिलेकडे कशाची याचना केली ?

 A) पाण्याची  B)  जेवणाची   C) विश्रांतीची   D) कपडयाची

4) बोलावणे या शब्दासाठी उताऱ्यात आलेला शब्द कोणता ?

A) पाचारण करणे B)   निमंत्रण देने   C)  आमंत्रित करने  D) वरील सर्व पर्याय बरोबर

5) साधुना झाडाखाली बसण्याची विनंती करून महिला घरात गेली ?

A) काम आवरायला  B) किती वाजले बघायला   C) पतिशी  चर्चा करायला  D) अश्याने ते साधु कंटाळून निघुन जातील म्हणून

6)महिला आश्चर्यचकित होते कारण ---

A) तिनही जणांना जेवायचे असते  B) साधु आपल्याच घरी का आले असावेत    C) तिघाना भूक असून केवळ एकच जन आत येणार  D) साधुचा आड़मुठ पणा पाहुन 

7) खालील पैकी कोण साधुच्या रुपात नव्हते

A) वैभव B)   यश   C) माया    D) प्रेम

8) जर महिलेने वैभव किंवा यश याना घरात बोलावले असते तर ....

A) महिला श्रीमंत झाली असती  B) इतर दोघे उपाशी राहले असते   C) साधु नाराज झाले असते D) यापैकी नाही 

9 )पाहुणचार या अर्थाने उताऱ्यात आलेला शब्द

A) दुर्गम  B)  यथायोग्य  C) आदरतिथ्य D) स्वागत

10) वरील उताऱ्यात किती व्यक्तिचा प्रत्यक्ष उल्लेख आलेला आहे ?

A) 2  B)   3   C)  4   D) 5


  vijaygiri143.blogspot.com 

🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚🥇📚

Tuesday, November 8, 2022

 💥🌈अखेर शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल २०२२ जाहीर 

Scholarship Exam Interim Result 2022

🔷 शाळेचा एकत्रीक निकाल

हा  निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेच्या udise व पासवर्ड असणे आवश्यक आहे . खालिल लिंक वरुन निकाल पाहू शकता⬇️⬇️⬇️⬇️⬇️

🌀विद्यार्थ्यांचा वैयक्क्तिक निकाल याठिकाणी आपण पाहू शकता.⤵️

(फक्त बैठक क्रमांक आवश्यक)

➡️सर्व विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोस्ट शेयर करा.

Sunday, October 23, 2022

🎯📚मिशन नवोदय 2023🎯📚

🪔दीपावली गृहपाठ 🪔

दिनांक 23/10/22

         ▪️उतारा क्र 2▪️

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा

      मेंदू , स्नायू व उतींच्या विविध आजारावर सुका मेवा उपयुक्त आहे. विशेषतः बदाममध्ये मध्ये मेंदूची कमजोरी दूर करण्यासाठी व ते मजबूत करण्यासाठी अद्वितीय गुणधर्म आहेत. बदाम मेंदूचे चैतन्य टिकवून ठेवते , स्नायू मजबुत करते, मज्जातंतू आणि पित्तविषयक विकारांपासून उद्भवणारे रोग नष्ट करते. 

      अक्रोड हे आणखी एक ड्राय फ्रुट आहे ज्यामध्ये मेंदूची कमजोरी दूर करण्याचे गुण आहेत. डॉ जॉन्सन यांचे मते बदाम , अंजीर , द्राक्षे , खजूर , सफरचंद, संत्री या मध्ये भरपूर फॉस्फोरीक घटक असतात ते सामान्यतः मेंदूचे काम करणार्यांनी गरजेचे असते. फॉस्फरस शरीरातील महत्वाच्या उतींचे पोषण करते. त्यामुळे मन अधिक कामासाठी उत्साही राहते.

       1) सुकामेवा उपयुक्त आहे कारण ते...

A) आपले हृदय मजबूत करते. 

B) मेंदू , स्नायू व उतीचे विविध रोग बरे करतात

C) आपला आत्मविश्वास वाढवितात.

D) आव्हानात्मक कार्यासाठी आपल्याला सक्षम करतात.

2) पुढीलपैकी कोणता बदामाचा गुण नाही

A) हे मेंदूचे चैत्यन्य टिकवून ठेवते.

B)ते स्नायूंना बळकट करते.

C) ते मज्जातंतू व पित्तविषयक विकारापासून निर्माण होणारे रोग बरे करते.

D) ते आपली पचनसंस्था मजवूत करते.

3) फॉस्फोरीक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात

A)बदाम , अंजीर , पेरू , चिकू , सफरचंद, संत्री

B) हिरव्या पालेभाज्या

C)बदाम , अंजीर , द्राक्षे , खजूर , सफरचंद, संत्री 

D) हंगामी फळे

4) मेंदूचे काम करणाऱ्यांनी  फॉस्फोरीक घटक असलेली फळे खावीत..

A) ते मेंदूची कमजोरी दूर करतात.

B)ते मन उत्साही ठेवतात.

C) ते शरीराच्या महत्वाच्या उतींचे पोषण करते.

D) वरील सर्व 

5)अद्वितीय म्हणजे....

A) सामान्य

B)उच्च पात्र

C)असामान्य

D) प्रबुद्ध


📝 प्रश्ननिर्मिती -

*श्री विजय गिरी सर*

880577729

https://vijaygiri143.blogspot.com

🪔🎉🪔🎉🪔🎉🪔🎉🪔🎉🪔🎉

Saturday, October 22, 2022

 🎯📚मिशन नवोदय 2023🎯📚

    🪔 🪔 दीपावली गृहपाठ🪔🪔

दिनांक 22/10/22

             उतारा क्र 1

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा

       एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला.

      त्याचा सह-प्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच, पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.* *स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल.

        राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.

       हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राज्याला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."

     राज्याने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.

      कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली.

       थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.

1) सहप्रवाशाने कुत्र्याला पाण्यात फेकून दिले कारण -

A)  त्याला कुत्र्याची मजा घ्यायची होती.  

B) कुत्र्याला पोहता येते की नाही ते पहायचे होते

C) कुत्र्याला त्रासाचा अनुभव देऊन शांत करायचं होतं

D) कुत्र्याच्या नाकातोंडात पाणी घालायचे होते.

2) कुत्रा अस्वस्थ होऊन उड्या मारत भुंकू लागला कारण -

A) त्याच्या नाकातोंडात पाणी शिरू लागले.

B)त्याच्यासाठी होडीतील प्रवास नवीन होता. 

C)थोड्या वेळाने होडी बुडणार होती. 

D) त्याला स्वःताचा जीव वाचवायचा होता.

3) अनुमती या अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द -

A) आकांत

B)तरंगणे

C)विनम्रपणे

D) परवानगी

4) नाव पलटली असती----

A) जर अजून एक दोन जण बसले असते

B)कुत्रा बाहेर फेकला असता

C) कुत्रा उड्या मारत राहला असता

D) नावाडी नावेत नसता तर

5)नावेत तयार झालेल्या समस्यावर कुणी मार्ग काढला

A) राजाने

B)नावड्याने

C)कुत्र्याने

D) सह प्रवाश्यांने

6 )उताऱ्याचे तात्पर्य काय ?

A) कुत्र्याला प्रवासाला नेऊ नये.

B) कुत्र्याला मांजर बनविणे. 

C)प्रवासात हुशार मित्र असावेत

D) स्वतः वर प्रसंग आल्याशिवाय परिस्थिती चे गांभीर्य समजत नाही.

7) उताऱ्यातून प्रवाश्यांचा कोणता गुण दिसून येतो?

A) स्पष्टवक्तेपणा

B) सभाधीटपणा

C) प्रसंगावधान

D) वक्तशीरपणा 

8)कुत्रा चुपचाप एका कोपऱ्यात जाऊन बसला कारण -

A) त्याची खोड जिरली होती.

B)त्याला थंडी वाजू लागली

C)त्याला भीती वाटू लागली

D) तो बदला घेण्याचा विचार करू लागला. 

📝 प्रश्ननिर्मिती -

श्री विजय गिरी सर* *880577729

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Saturday, July 9, 2022

 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल जाहीर 

      यशाची परंपरा या वर्षीही ...5 विद्यार्थ्यांची निवड

          सन 2021 - 22 चे पात्र विद्यार्थी 







Sunday, June 26, 2022

        



        ❱❱ मिशन नवोदय 2023 ❰❰ 

   दिनांक - 26/07/2022

▪️खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधा

     〇 उतारा 9 〇 

  खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा

 धुळीने भरलेले दोन प्रवासी. थकलेले, भागलेले, वणवण उन्हामध्ये उघडया रखरखीत रस्त्यावरून चालत होते. डोक्यावर भयंकर ऊन 'मी' म्हणत होते. इतक्यात रस्त्याच्या कडेला त्यांना एक मोठे झाड दिसले. मोठया आनंदाने ते तिकडे वळले. त्यांनी झाडाखाली आसरा घेतला. विसाव्यासाठी त्यांनी तिथेच बसकण मारली. दूरदूर विस्तारलेल्या झाडाच्या फांद्यांमुळे तिथे बराच गारवा होता. प्रवाश्यांचा कासाविस जीव झाडाच्या सावलीमध्ये सुखावला.

विश्रांती घेता घेता तिथे पहुडलेल्या एकाची नजर झाडाच्या फांदीकडे गेली. तो आपल्या सहप्रवाशाला म्हणाला, 'फुकट हे एवढं मोठ्ठं झाड आहे. फळं धरत नाही. काही नाही. काय उपयोग या झाडाचा माणसाला? '

ते ऐकल्यावर संतापून झाड म्हणाले, 'किती कृतघ्न रे तूं ! तापलेल्या उन्हातून इथे आलास तो माझा आसरा घेण्यासाठी. या क्षणी प्रत्यक्ष माझ्या सावलीत बसलेला आहेस, तरीसुध्दा तू मला निरूपयोगी म्हणून हिणवत आहेस...'

प्रश्न 1) झाडाखाली खूप गारवा होता कारण - 

A) उन्हाळा होता

B) झाड सावलीत होते

C) झाडाच्या फांद्या विस्तीर्ण होत्या.

D)नुकताच पाऊस पडला होता.


2) कृतघ्न म्हणजे ....

A) केलेले उपकार जाणणारा 

B)केलेले उपकार  न जाणणारा

C) देवाला न मानणारा 

D) देवाला मानणारा


3) ऊन "मी" म्हणत होते म्हणजे .....

A) खूप कडक ऊन होते

B) ऊन उतरत चालले होते

C) ऊन बोलवत होते 

D) ऊन सौम्य होते


4) व्याकुळ होणे या अर्थाचा उताऱ्यात आलेला वाक्यप्रचार कोणता ? 

A) आसरा घेणे

B)कासावीस होणे

C) बसकन मारणे

D) मी म्हणणे


5) उताऱ्याचे तात्पर्य काय ? 

A) उन्हाळ्यात उगाच बाहेर फिरू नये.

B) कृतघ्न शेवटी कृतघ्नच असणार

C) जास्त ऊन असतांना झाडाखाली बसावे.

D) कुणालाही मदत करून नये. 


6) उपयोगी या शब्दाचा विपरीत अर्थ असलेला शब्द ....

A) उपयुक्त 

B) निरुपयोगी

C) विस्तारलेला 

D) गरजवंत


प्रश्न निर्मिती - विजय रा गिरी 

जि प व प्रा शाळा शेलु खडसे 

ता रिसोड जि वाशिम 8805577729

http://vijaygiri143.blogspot.com

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Thursday, June 23, 2022

 🎯💫मिशन नवोदय💫🎯

दिनांक - 23/6/2022  

📚आजचा गृहपाठ

प्रश्न :- खालील संख्या अंकात लिहा. 

1) साडे तीन हजार 

2)पावणे नऊ हजार

3)सव्वा सहा लक्ष

4)अडीच लाख

5)पावणे नऊ लाख

6)सव्वा आठ लाख

7)पावणे चार हजार

8)साडे सात लाख

9) सव्वा चारशे

10) पावणे आठशे

11) साडे बारा हजार

12) साडे तीन लाख

13) साडे सात हजार

14) सव्वा दोन हजार

15)साडे आठ हजार

16) पावणे दहा लाख

17)सव्वा लाख

18)पावणे आठ लाख

19)दीडशे

20) अडीचशे

21)पावणे तीनशे 

22) सव्वा आठशे 

23) सव्वा सात लाख

24) साडे नऊ हजार

25) पावणे अकरा शे

*📝 विजय गिरी सर*

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Thursday, June 16, 2022

 पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी

👉 इयत्ता पहिली ते दहावी चाचण्या खालील लिंक ला क्लीक करून 

डाऊनलोड करा व प्रिंट काढून ठेवा

प्रस्तुत चाचणी 17 किंवा 18 जून 2022 रोजी घ्यायची असून विदर्भातील शाळांसाठी 1 किंवा 2 जुलै 2022 रोजी घ्यायची आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Sunday, June 12, 2022

बदली 2022 अपडेट

 बदली 2022 सुधारित वेळापत्रक 

खालील ok बटन वर क्लीक करून बदली बाबतच्या सुधारित तारखा जाणून घ्या.


टीप :- सदरील माहिती हि केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी व माहितीसाठी येथे ठेवली आहे. सर्व हक्क संबंधित कंपनीच्या अधीन आहेत.



Thursday, June 9, 2022

 शिक्षक बदली प्रक्रिया पोर्टल सुरु - Online Teacher Transfer Portal

ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टलचे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. मा. ना.श्री. हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन  घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 

या प्रणालीचे वैशिष्टे :-

संगणक तथा मोबाईलवर सहज वापरता येते. 

यामध्ये मोबाईल नंबरने लॉगीन करता येते. 

प्रत्येक वेळी स्वतंत्र OTP येतो. 

त्यामुळे सुरक्षितता अधिक आहे. 

बदली प्रणालीतील प्रत्येक प्रक्रीये संदर्भात व्हिडीओ बनविण्यात आलेले आहेत. 

प्रत्येक सूचना वेळोवेळी इ मेल व एस एम एस दारे मिळेल. 

याच्यामध्ये कोणी माहिती बदलण्याचा प्रयत्न केल्यास लक्षात येते. त्यामुळे अधिक सुरक्षितता आहे. 

या प्रणालीमध्ये कोणतीही प्रक्रिया पार पडली कि त्या संदर्भात PDF संबंधिताच्या मेलवर प्राप्त होते.

संबंधित बदली प्रक्रियेची वेबसाईट खालील प्रमाणे आहे. 

 http://ott.mahardd.com 👈🏻 शिक्षक बदली पोर्टल नवीन वेबसाईट

 OTT.MAHARDD.COM :

👇👇👇 

 O = ONLINE

 T = TEACHER 

T = TRANSFER

MAHA  = MAHARASHTRA 

RDD = RURAL DEVELOPMENT DEPARTMENT 

 सदरील नवीन बदली पोर्टलला भेट देण्यासाठी खालील क्लिक HERE बटनाला क्लिक करा. अधिकृत सूचना आल्याशिवाय कोणीही माहितीत बदल करू नये. 

सदरील माहिती हि केवळ शिक्षकांच्या सोयीसाठी व माहितीसाठी येथे ठेवली आहे. सर्व हक्क संबंधित कंपनीच्या अधीन आहेत.



Sunday, April 10, 2022

*_🛑 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा प्रवेशपत्र_*

*_▶️ Navodaya Entrance Exam Admit Card download_*

*_▶️ प्रवेशपत्रावरील नवोदय प्रवेश परीक्षेच्या सूचना वाचा_*

*_▶️ नवोदय प्रवेश परीक्षा तारीख आणि वेळ पहा._*

*_🔰 नवोदय विद्यालय प्रवेशपत्र डाऊनलोड साठी खालील लोगो वर क्लीक करा👇_*

__________



*_🛑शैक्षणिक अपडेटसाठी गुगल सर्च करा_*👇

http://vijaygiri143.blogspot.com

*_इतर शैक्षणिक ग्रुपमध्ये पाठवा_🙏*


 

Sunday, January 30, 2022


जगाला सत्य व अहिंसेचा मूलमंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!


 ❱❱ *मिशन नवोदय 2022* ❰❰

*खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा*

*📘📚🇮🇳 उतारा 6 🇮🇳📚*
        *महात्मा गांधी आमचे राष्ट्रपिता आहेत. त्यांचे नाव मोहनदास गांधी असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई होते. गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ ला गुजरात मधील पोरबंदर या ठिकाणी झाला. लहानपणी मोहनदास अभ्यासात साधारण होते, पण त्यांच्या मनात आई वडिल व गुरूजनांविषयी अतोनात आदर होता. मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. ते बॅरिस्टर झाले आणि वकिली करू लागले.*
*इंग्लंडहून बॅरिस्टरची पदवी घेऊन ते भारतात आले. काही दिवस वकिली म्हणून काम केल्यावर एका खटल्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिका येथे जावे लागले. तेथे अनेक भारतीय व्यापारी आणि मजूर रहात होते. त्यांच्यावर फारच अन्याय होत असत. भारतीयांच्या हक्कासाठी अहिंसक लढा दिला. शेवटी त्याचा जय झाला.*
*गांधीजी जेव्हा भारतात परतले तेव्हा येथे सुध्दा जनतेच्या हालअपेष्टा त्यांना पहावल्या नाहीत. भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी त्यांनी एक विचारांची अखंड चळवळ उभी केली. भारतीयांना इंग्रजांच्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी सत्तेतून बाहेर करण्यासाठी सत्याग्रहाच्या व उपोषणाच्या मार्गाने मुक्त करण्याचा निर्धार केला. देशासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. गांधींचे संपूर्ण जीवन त्यागाचे होते. म्हणून त्यांना लोक 'बापू' म्हणत. तसेच त्यांच्या अलौकिक कार्यामुळे लोकांनी त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली. सारा देश त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो.*
*इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी अहिंसा, असहकार, स्वदेशीचा वापर या सूत्रांनुसार त्यांनी इंग्रजांना देश सोडण्यास भाग पाडले. 'चले जाव चळवळ, दांडी यात्रा अशा विधायक मार्गाचा वापर करून भारताला १५ आगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले.*

========================
 
 प्रश्न1)महात्मा गांधीजी यांचा जन्म कोठे झाला ?
A) गुजरात
B)पोरबंदर
C)इंग्लंड
D) विलायत
प्रश्न 2) खालील पैकी कोणती पदवी गांधीजींशी संबंधित नाही ?
A)बापू
B)महर्षी
C)महात्मा
D) राष्ट्पिता
प्रश्न 3)खालीलकी गांधीजी बाबत चुकीचे विधान कोणते
A) लहानपणी ते अभ्यासात साधारण होते.
B) त्यांना आई वडील , गुरुजनांबद्दल आदर होता. 
C)पुढच्या शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले.
D) सारा देश त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखतो.
प्रश्न 4) इंग्रजांना भारतातून हाकलून देण्यासाठी खालील पैकी कोणत्या सूत्राचा गांधींनी वापर केला नाही ?
A)अहिंसा
B)स्वदेशी
C) जुलूम
D) असहकार
प्रश्न 5)मनाशी निश्चय करणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उताऱ्यात आला आहे?
A) मुक्त करणे
B)अन्याय करणे
C)लढा देणे
D)निर्धार करणे
  

  *━━━━प्रश्न निर्मिती━━━━**
  *विजय रामरतन गिरी*
       *जि प व प्रा शाळा शेलु खडसे ता रिसोड जि वाशिम*
     📞 *8805577729* 📞
     ════ 🎯🎯🎯════